डोनजा ,देऊळगाव,तांदुळवाडी गावांना महापूर !
परांडा प्रतिनिधी -जोतिराम घोगरे
परांडा तालुक्यात उत्तरा नक्षत्र शेतकऱ्यांना धोक्याचे ठरले विदारक चित्र पाहवायस मिळत आहे परांडा तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसाने काढणीला आलेले उडीद, सोयाबीन, मका पाण्यात असल्यामुळे हातून वाया गेले आहे.तालुक्यातील सिना कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे महापुराने ठिकठिकाणी थैमान घातले आहे सीना, खैरी, नळी या नदी काठी असलेल्या ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे .देऊळगाव जि. प. शाळेत पाणी शिरल्यामुळे शाळा बंद केल्याची माहिती मुख्याध्यापक भागवत घोगरे सर यांनी दिली. तसेच डोनजा गावातील करमाळा रोड लागत असलेले सागर पाटील यांच्या घरात शेजारी असलेले मारुती मंदिर, मस्जिद आणि भीम नगर च्या काही भागात महापुराच्या पाण्याने शिरकाव केला आहे. तांदुळवाडी गावातही पुराचे पाणी शिरले आहे.तरी लवकरच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे..





















