आवाड शिरपूरा येथे नदीपुलावरून पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही गावाचा संपर्क तुटला ग्रामस्थांना मोठा त्रास !
कळंब तालुका प्रतिनिधी तोफिक मोमीन
कळंब :तालुक्यातील मौजे आवाड शिरपूरा येथे मांजरा नदीवरील पुलाच्या संरक्षक कठड्याची दुरुस्ती तात्काळ करणे गरजेचे यावर्षी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पुलावरील संरक्षक कठडे पूर्णपणे वाहून गेलेलीआहेत या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ चालू असते.शालेय विद्यार्थी या पुलावरून दररोज शाळेसाठी ये जा करत असतात.तसेच या पुलावरून नॅचरल शुगर रांजणी , येडेश्वरी साखर कारखाना, गंगा माऊली साखर कारखाना ,तेरणा सहकारी साखर कारखाना या सर्व कारखान्यास जाणारा ऊस याच पुलावरून वाहतूक करावा लागतो हा पूल गावकऱ्यांसाठी बाजारपेठेशी संपर्क साधणारा महत्त्वाचा मार्ग असून दररोज शेकडो लोकांची ये-जा या पुलावरून होते.ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून अन्यथा एखादा अपघात होण्याची भीती व्यक्त केली आहे.





















