कळंबमध्ये डीजे मुक्त अभियानाचा उडाला फज्या;दंगल पथक दाखल होताच डीजेचालक फरार!
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:- जिल्ह्यात सर्वत्र डी जे ला बंदी असताना कळंब शहरातील मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीला पोलीस प्रशासनाने परवानगी कशी काय दिली असा संतप्त सवाल नागरिकां मधून उपस्थित केला जातो आहे कळंब शहर हे सर्वधर्म समभाव म्हणून ओळखले जाणारे शहर असून शहरात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर्वधर्माच्या नागरिकांचा मोठा सहभाग आणि सहकार्याचे दर्शन होते मात्र दि.११ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या वेळेला मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती रॅलीमध्ये मोठ्या आवाजात आणि किरकस आवाजात डी जे वाजण्याच्या प्रकार समोर आल्याने डीजे ला पोलीस प्रशासनाने परवानगी दिली कशी असा रोष नागरिक व्यक्त करत आहेत संबंधित पोलीस प्रशासनाने कानात बोळे का घातले?असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.जुलूस मिरवणुकीत डीजेचा किरकिर आवाज कानठळ्या बसवणारा ठरला आवाजाच्या कर्कश्यतेने शहरातील व्यापारी, नागरिकांना त्रास झाला पोलीस प्रशासन व स्थानिक अधिकाऱ्यांची उपस्थिती असूनही बंदीचा भंग झाल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.या मिरवणुकीत युवकांनी डीजेच्या किर्र्र आवाजात नाचण्याचा मोह आवरला नाही नियमांचे उल्लंघन करून डीजे सेट बसविण्यात आले. आवाज इतका मोठा होता की, शाळकरी मुले,वृद्ध नागरिक तसेच आजारी रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.डीजे बंदीबाबत प्रशासनाने जाहीर केलेल्या आदेशांना अक्षरशः पायदळी तुडविण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून डीजेच्या मोठ्या आवाजामुळे होणारे परिणाम लक्षात घेऊन शासनाने बंदी आदेश जारी केला आहे मात्र प्रत्यक्षात कायद्याचे उल्लंघन होत असतानाही संबंधित विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही.शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांनी डीजेच्या आवाजामुळे जीवितास धोका निर्माण झाला असून शारीरिक दुष्परिणाम होत असल्याबद्दल निवेदने दिली आहे. दरम्यान, शहरात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात गणेशोत्सव आणि ५ सप्टेंबरला महंमद पैगंबर जयंती साजरी झाली.या उत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर होणार नाही याची पोलीस प्रशासनाने काळजी घेतली होती.पण शहरात महंमद पैगंबर जयंती निमित्त जुलूस मिरवणुका काढण्यात आली नव्हती समाज बांधवाच्या वतीने गुरुवारी शहरात जुलूस मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते किर्र आवाजात डीजे वाजवून मिरवणुका काढण्यात आल्याची सोशल मीडियावर मुस्तान मिर्झा यांनी संताप व्यक्त केल्यानंतर दंगल नियंत्रण पथक शहरात दाखल झाले आणि क्षणात डीजे चालक पळून गेले. मात्र स्थानिक पोलीस प्रशासन गप्प का होते असा सवाल नागरिकांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला जात आहे.जुलूस मिरवणुकीत डीजे बंदी फक्त कागदावरच राहिली आहे. प्रत्यक्षात जुलूस मिरवणुकीत डीजेचा आवाज ऐकू येतो. पोलीस डोळ्यांदेखत सगळं घडतंय, मग कारवाई का केली नाही.- मूस्तान मिर्झा, कळंब





















