शिराढोण शहरातील साठे नगर भागातील पाण्याचा प्रश्न सुटला अखेर बोरवेल सुरू !
तोफिक मोमीन प्रतिनिधी कळंब: तालुक्यातील शिराढोण येथील साठे नगर भागातील बोरवेल चा खर्च मातंग समाज बांधवांनी वर्गणी गोळा करून जमा केला येथील बोरवेल चे काम सुरू झाले परंतु मोटर लाईट कधी खर्चासाठी निधी कमी पडला त्यामुळे आज ना उद्या येथील नेते मंडळी एकूण काय हातभार लागेल याची अपेक्षा होती परंतु ते काहीच जमले नसल्यामुळे अखेर तरुणांनी आमदार कैलास दादा पाटील यांची भेट घेऊन पाणी प्रश्नाचे समस्या सोडविण्यास सांगितले व दोन लक्ष निधी उपलब्ध झाला व पाण्यासाठी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी अखेर पाण्याची समस्या सोडविली यावेळी मातंग समाजातील सर्व समाज बांधवांनी आमदार यानी केलेल्या कामाचे अभिनंदन केले .





















