कळंब लातूर रोडवर चौसाळा( लोहटा पूर्व ) गावांमध्ये खड्डेमय प्रवास
जनक्रांतीसाठी कळंब तालुका प्रतिनिधी तोफिक मोमीन शिराढोण
कळंब: प्रतिनिधी तोफिक मोमीन शिराढोण कळंब:- तालुक्यातील चौसाळा गाव जवळ लातूर रोड असलेल्या गावात चौसाळा लोहटा पूर्व या गावा मध्ये रोडला आडवे पाईपलाईनचे खड्डे केल्यामुळे व रात्रीच्यावेळी अंधार होऊन अपघाताचा धोका वाढला आहे चौसाळा गावाजवळ रोडला पडलेला खड्डा हा अपघाताचा मेन केंद्रबिंदू ठरत आहे यामुळे अनेकांचे जीव धोक्यात जाण्याची शक्यता आहे नवीन माणसं या रस्त्याने ये जा करणारे त्यांना रोड पूर्ण सुसाट असल्यामुळे न दिसणारा खड्डा त्याच्यामध्ये गाडी पडून त्यांना मार लागण्याची इजा होण्याची शक्यता आहे या ठिकाणी बांधकाम विभागाने तत्पर करून खड्डागुजविण्यात यावा अशी मागणी ये जरा करणाऱ्या नागरिकांची प्रवाशाची व इतर आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी केले आहे याकडे बांधकाम विभाग लक्ष देणार का यावर सगळ्याचेच लक्ष लागले आहे





















