आ.नमीता मुंदडा देवाच्या दारी तरी खाऊजी पना सोडा /सत्तेचा गैरवापर करीत मुंदडा पती-पत्नीची नावे योगेश्वरी कमिटीत इतर भक्त गेले कुठे?
अंबाजोगाई/ प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी देवल कमिटी चा वाद अखेर संपुष्टात आला असून योगेश्वरी देवल कमिटीची नवीन कार्यकारणी धर्मादायुक्त यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली.या देवल कमिटीत भ्रष्टाचाराचा ठपका असणाऱ्या माजी देवल कमिटी सदस्यांचा समावेश असून तसेच देवीचे दागिन्यावर डल्ला मारनाऱ्या, दारू विक्रेते करत हजारो कुटुंब उध्वस्त करणारे,देवस्थान जमिनी लाटणाऱ्या भूमाफिया तसेच जयवंती नदी हडप करणाऱ्या नामवंत पुढाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे वास्तविक पाहता नवीन देवल कमिटी सदस्यांपैकी कोणीही देवीची सेवा करत नाही किंवा देवल कमिटीसाठी वेळ देत नाही ही कमिटी केवळ योगेश्वरी देवल कमिटी ची जमीन हडपण्यासाठी करण्यात आली असून यात आमदार पती-पत्नींचा समावेश देखील करण्यात आला आहे वास्तविक पाहता कोणत्याही कुटुंबातील एक जण देवल कमिटीत असताना त्याच कुटुंबातील दुसरा व्यक्ती देवल कमिटीत घेणे दुर्दैवी असून अंबाजोगाई शहरातील इतर भक्त मेले की काय असा प्रश्न आम्हास पडतोय? 1973 पासून योगेश्वरी देवल कमिटी च्या माध्यमातून अनेक जमिनी बेकायदेशीर हस्तांतरित करण्यात आल्या, योगेश्वरी देवीच्या अनेक मोक्याच्या जागा, बेकायदेशीर रित्या इतरांना देण्यात आल्या असून महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादी ची सत्ता असल्याने योगेश्वरी देवीची जमीन हडपण्यासाठी अंबाजोगाई शहरातील राष्ट्रवादी भाजपचे नेते हुकूमशाही व सत्तेचा गैरवापर करत योगेश्वरी देवल कमिटीत देवस्थान जमिनी जयवंती नदी ती व देवीच्या जमीन दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचा भरणा केला असून लुटारूनच्या हाती योगेश्वरी देवल कमिटीची सूत्रे देण्यात आली असल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.





















