ठाणे पोलीस आयुक्त यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड कार्यक्रम!
जनक्रांती न्यूज साठी कळंब प्रतिनिधी तोफिक मोमीन
ठाणे पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुक्यातील शिराढोण येथे सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय परिसर व गावाच्या दुतर्फा बाजूला 57 वर्षाची लागवड केली यामध्ये बेल उंबर कडुलिंब पिंपळ वडाचे व इतर वृक्ष लावण्यात आले हे सर्व वृक्ष लातूर येथील दिशा फाउंडेशन ग्रीन लातूर च्या सौ वैशालीताई यादव लोंढे, नगरसेवीका श्वेता ताई लोंढे,यांच्या माध्यमातून मोफत देण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर साहेब,माजी सरपंच पद्माकर पाटील,माजी.प. स.सदस्य राजेश्वर पाटील,अमोलसिंह चंदेल,संजय दादा शेळके, ताजखा पठाण, सरपंच लक्ष्मीबाई मेहत्रे ग्रामपंचायत सदस्य व बेबी नंदा गोरे अंजली गायकवाड ज्योती महाजन कोमल नाईकवाडे सुनिता गाडे वृक्ष प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील, यांच्या हस्ते व सहकार्यातून शाळेच्या प्रांगणात वेगवेगळ्या प्रजातीच्या वृक्ष लागवडीचा सोहळा पार पडला प्रसंगी मु.अ.श्रीमती ठाकूर एम. व्ही. श्री.तौर,श्री.कवडे, श्री. पंडित, श्रीमती स्नेहल आवाळे, श्रीमती देशमुख, श्रीमती सुडके श्री.लाकाळ व विधार्थिनी उपस्थित होते.





















