आता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही/मुंबईला जाताना दगा फटका झाला मोदी सरकारला सुध्दा हादरा बसलाय!
बीड/प्रतिनिधी
अंतरवाली सराटीत झालेली चूक पुन्हा करू नका, तुम्ही जर काही भानगड करायला जाल तर त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधानांना देखील भोगावी लागेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. मराठा सम राजाच्या वतीने २९ तारखेला मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील काल (५ ऑगस्ट) धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज धाराशिव शहरामध्ये जरंगे पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीदरम्यान विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेऊन २९ ऑगस्टच्या मुंबई येथील आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलंय. यावेळी ते बोलत होते. मराठा आरक्षण लढ्यातील विजय मि ळवल्याशिवाय आपण फेटा बांधणार नाही अशी शपथ जणू मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टला मुंबईला धडक देण्याची तयारी सुरु केली आहे. या आंदोलनात आता माघार घेतली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आता आपण मराठा आरक्षण मिळवूनच स्वस्थ बसणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला धडक देणार असल्याचे म्हटले आहे. आज धाराशिव येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून फेटा बांधण्याचा आग्रह करण्यात आला, त्यावेळी आता मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्यावरच फेटा खालू असे म्हणत त्यांनी फेटा बांधण्यास नकार दिला आहे. २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार सक्रिय सहभाग घेणार आहेत.





















