भ्रष्टाचार दाखवा म्हणारे सर्वेसर्वा साहेब घाणीचे काय करायचे?/केजच्या नाकावरची ही घाण नगरपंचायतला कधी दिसणार ?
केज/प्रतिनिधी
केज शहरातील दर्शनी भाग म्हणजे रेस्ट हाऊस आणि या रेस्ट हाऊसमध्ये खूप सुंदर वृक्ष लागवड झालेली असल्याने हा भाग प्रेक्षणीय आहे. या समोरच हॉटेल रविराज हे केज शहरातील सुप्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये नेहमीच वेगवेगळ्या पक्षातील राजकीय मंडळींचीही गर्दी असते परंतु या भागातच घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. या घाणीमधे कुत्रे आणि डुकरं नेहमीच गोंधळ घालतात आणि ती घाण यामुळे रस्त्यावर विखुरलेल्या स्वरुपात पहायला नेहमीच मिळते. या ठिकाणी शासकीय विश्रामगृहमधे अनेक बाहेरची राजकीय नेते मंडळी देखील येत असतात तेव्हा ही घाण पाहून वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करत असतात परंतु केजच्या नाकावरची ही घाण नगरपंचायतला कधी दिसणार हा प्रश्न सामान्य नागरिकांना आहे.कारण अशा घाणीचे साम्राज्य पसरत राहीले तर नागकांचे आरोग्य धोक्यात जाऊ शकते.





















