Homeताज्या बातम्याचितळी परिसरामध्ये कृषी पंपाची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ/सोलर पॅनल, कॉपरची केबल, पंप,...

चितळी परिसरामध्ये कृषी पंपाची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ/सोलर पॅनल, कॉपरची केबल, पंप, स्टार्टर चोरी!

चितळी परिसरामध्ये कृषी पंपाची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ/सोलर पॅनल, कॉपरची केबल, पंप, स्टार्ट र चोरी!

अहिल्यानगर /प्रशांत बाफना जिल्हा प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यातील चितळी परिसरामध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या विहीर व बोरवेल वर बसवलेल्या सोलर पॅनलचे कोपरची केबल ,स्टार्टर व मोटर यांची चोरी करणारी टोळी या भागामध्ये कार्यरत आहे. एकाच रात्रीमध्ये नऊ दहा शेतकऱ्यांची या टोळीने नुकसान केले असून काही सोलर पॅनलची फोड तोड केली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. रात्रीच्या वेळी शेतामध्ये गस्त घालावी तर वन्यप्राण्याची भीती आहे. मागील एक महिन्यापासून बिबट्या या भागांमध्ये तळ ठोकून आहे. आठ दिवसापूर्वी या भागातील घोडके वस्तीवर हल्ला चढवून शेळीची शिकार केली होती. अर्जुन नाना आमटे यांच्या वस्तीवर गाईचे वासरू मारले होते. गावातील काही तरुणांनी सायंकाळी सात वाजता आव्हाना मुख्य रस्त्यावर त्याचे व्हिडिओ काढले होते. अशी परिस्थिती असताना रात्रीच्या वेळी शेतकरी गस्त घालू शकत नाही, या गोष्टीचा फायदा घेत चोराने या भागात धुमाकूळ घातला आहे. दिनांक एक ऑगस्ट रोजी एकाच रात्री नऊ दहा शेतकऱ्यांचे नुकसान केले. वाघाच्या भीतीने गस्त घालता येत नाही ,आणि चोराच्या भीतीने कृषी पंप राहत नाही. एकीकडे पावसाळ्याचा सीजन असताना पाऊस नाही ,ऊन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे पिक पाण्याअभावी सुकले आहेत. त्यांची वाढ खुटली आहे. शेतकरी दिवसा कपाशी, सोयाबीन ,उडीद, बाजरी या पिकांना पाणी देत आहे मात्र शेती पंपाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. बाप पोट भरू देइना, अन माय भीक मागू देइना अशी शेतकऱ्यांची द्विधा अवस्था झाली.ज्या शेतकऱ्यांची चोरी झाली त्यामधील संजय कुटे, भीमराज ढमाळ , भाऊराव पवार, पोपटआमटे, संदीप आमटे, शिवाजी आमटे, दत्तात्रेय आमटे, अर्जुन आमटे, अमोल कदम, भारत ताठे , भिवाजी आमटे, सोमनाथ ढमाळ, या शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी वस्तू चोरट्याने चोरून नेल्या त्यामुळे संतप्त शेतकरी उद्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करणार आहेत व आपले गाऱ्हाणे शासनाच्या दरबारात मांडणार आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सावध राहावे व आपल्या वस्तूंचे संरक्षण करावे. पोलीस लवकरात-लवकर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!