बँकेने खाते केले होल्ड “सरपंच आणि उपसरपंच यांच्या प्रयत्नाला यश” लाभार्थ्यांना दिलासा!
जनक्रांती न्युज/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी रामराजे जगताप
धाराशिव:- राज्य व केंद्र शासनाकडून निराधार,अपंग,शेतकरी,लाडकी बहिण आणि घरकुल लाभार्थी यांना विविध योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना रक्कम दिली जात आहे ते थेट डिबिटी मार्फत समंधीत लाभार्थ्यांच्या खातेवर वर्ग केली जाते परंतु कळंब तालुक्यातील आंदोरा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅक मस्सा (खं) या बॅंकेने थकित पिक कर्जाच्या नावाखाली शेतकरी, अपंग,निराधार,लाडकी बहिण आणि घरकुल लाभार्थी यांचे बॅंक खाते होल्ड केले होते त्यामुळे लाभार्थीकडुन नाराजीचा सूर ऐकायला मिळत होता याची दखल घेत कन्हेरवाडी गावचे सरपंच ॲड रामराजे जाधव,उपसरपंच विजय उर्फ सोनु कवडे यांनी सोमवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आंदोरा या शाखेतील शाखा अधिकारी यांची भेट घेऊन पत्र दिले आहे त्या पत्रात असे म्हटले आहे की कन्हेरवाडी येथील शेतकरी, निराधार, लाडकी बहिण,अपंग,तुती शेतकरी, फळबाग शेतकरी आणि घरकुल लाभार्थी यांचे केंद्र किंवा राज्य शासनाकडून आलेली रक्कम कर्ज खातेत वर्ग न करता ती रक्कम संबंधित लाभार्थी यांना देण्यात यावे जर नाही दिले तर कन्हेरवाडी ग्रामस्थाच्या वतीने बॅंकेच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे पत्रात नमूद करण्यात आले होते शासनाकडून दिली जाणारी रक्कम लाभार्थ्यांना देणे अपेक्षित आहे कारण हि रक्कम बॅंकेला अटकवुन ठेवता येत नाही असा शासनाचा आदेश असताना रक्कम संबंधित लाभार्थ्यांना मिळने अपेक्षीत आहे हि रक्कम तात्काळ संबंधित लाभार्थ्यांना देण्यात यावा असेही पत्रात नमूद करण्यात आले होते लागलीच शाखाधिकारी यांनी वरिष्ठांशी चर्चा करून बॅंकेच्या शाखाधिकारी यांनी हिरवा कंदील दाखवत वरील सर्व लाभार्थ्यांचे बॅंक खाते होल्ड केले असले तरी शासनाकडून आलेली रक्कम लाभार्थी यांच्याकडून लेखी अर्ज घेऊन ती पुर्ण रक्कम संबंधित लाभार्थी यांना देण्यात येईल असे आश्वासन सरपंच आणि उपसरपंच यांना दिले त्यामुळे वरील सर्व लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.





















