Homeताज्या बातम्यारामदास ताठे कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित!

रामदास ताठे कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित!

रामदास ताठे कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित!

अहिल्यानगर प्रतिनिधी/प्रशांत बाफना

पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील श्री रामदास ताठे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नांदेड)व सौ शैला ताठे यांना सपत्नीक द. युवा ग्रामीण पत्रकार संघाचा “कार्यगौरव पुरस्कार’ दिनांक 30 जुलै रोजी अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये अग्निशमन दलाचे अहिल्यानगर जिल्हा प्रमुख श्री. शंकर मिसाळ साहेब, व कोतवाली चे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते साहेब, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अन्सार शेख, पत्रकार संघाचे राज्य सचिव कविवर्य बाळासाहेब कोठुळे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला. यावेळी विचार मंचावर पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष जीवन मोहिते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब काळे, पत्रकार संघाच्या डॉक्टर मंगलाताई सासवडे, पत्रकार संघाचे पुणे जिल्हा प्रमुख शकील मणियार, हेमंत साठे,ह.भ.प. कृष्णा महाराज ताठे, सौ कावेरी ताठे, मदन ताठे, श्री सर्जेराव आमटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.श्री. रामदास ताठे हे केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स या विभागांमध्ये सेवा करत असून यापूर्वी त्यांनी 1999 मध्ये आर्मी मध्ये नोकरी केली. या काळात नक्षलवाद, आतंकवाद, यांच्याशी त्यांनी खंबीरपणे लढा दिला. नागालँड, मणिपूर, केरळ, आसाम, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, पंजाब ,यासारख्या राज्यात त्यांनी मातृभूमीची सेवा केली ,अनेक आतंकवाद्याला यम सदनी पाठवले. व सध्या ते केंद्रीय रिझर्व पोलीस मध्ये महाराष्ट्रातील नांदेड या ठिकाणी सेवेमध्ये कार्यरत आहेत. गेली 26 वर्ष भारत मातेची प्रामाणिकपणे ते सेवा करत असून त्यांना आतापर्यंत अनेक किताब भारत सरकारच्या वतीने बहाल करण्यात आले. तसेच अनेक मेडल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या साऱ्या कार्याचा विचार करता द.युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुरस्कार कमिटीने त्यांची निवड 2025 च्या “कार्यगौरव” पुरस्कारसाठी केली आहे.प्राप्त झालेल्या त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरामधून अभिनंदन होत आहे. प्रचंड मेहनत, प्रामाणिकपणा, मातृभक्ती, या त्यांच्या सदगुणामुळे त्यांना पुढील कार्यासाठी सर्व चितळी ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!