संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय/वाढदिवस साजरी नाही करता महादेव मुंडे यांना न्याय देण्यासाठी व्यापक बैठक!
बीड/प्रतिनिधी
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या न्यायासाठी सरकारकडे दाद मागत आहेत. काल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला होता.यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही कायम महादेव मुंडे यांच्या कुटुंबासोबत राहणार आहोत आणि न्याय भेटल्याशिवाय मागे हटणार नाही. हत्या किती क्रूरपणे झाली हे कुणाला माहीत नव्हते, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना माहीत झाले. महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर आरोपी आठ दिवस मांस घेऊन फिरत होते. मुख्यमंत्री यांना मान खाली घालयला लावणारी बाब आहे. कारण तुमच्या राज्यात महादेव मुंडेचा खून होतो आणि ते आरोपी दोन वर्षे सापडत नाहीत यांचे दुःख व्यक्त करत संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करायचा नाही व महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांच्या मागे खंबीरपणे उभे राहणाहुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वाढदिवस साजरी नाही करता स्व. महादेव मुंडे यांना सर्वतोपरी न्याय मिळण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वधर्मीय, सर्वपक्षीय, सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, सरपंच, चेअरमन संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील, स्व. महादेव मुंडे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत व्यापक बैठक आयोजक सकल मराठा समाज बीड जिल्हा दिनांक – १ ऑगस्ट २०२५ रोजी दु.१२ वाजता ठिकाण – रामकृष्ण मंगल कार्यालय, बीड येथे ठेवण्यात आली आहे.





















