भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी राहुल गदळे यांची निवड!
केज /प्रतिनिधी
पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांचे खंदे समर्थक केज तालुक्यातील युवकांचे आधारस्तंभ राहूल गदळे यांची भाजपच्या युवा मोर्चा केज तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याने तालुक्यातील भाजपाची ताकद वाढणार आहे.राहुल गदळे यांची भाजपच्या युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड झाल्या प्रसंगी नवनिर्वाचित युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निवड झाल्याने यांचा सत्कार करून भाजप पक्षाच्या नेत्यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.केज तालुक्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता राहुल गदळे यांची निवड महत्त्वाची ठरत आहे. केज तालुक्यातील युवा नेते राहुल गदळे यांनी भाजप पक्ष यांच्याशी एकनिष्ठ राहून सच्चा कार्यकर्ता म्हणून सदैव समाज कार्य करत राहिल्यामुळे कामाची पावती म्हणून राहुल गदळे यांची भाजप युवा मोर्चा केज तालुकाध्यक्ष पदी निवड केल्यामुळे केज तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेमध्ये आनंद झाला असून राहुल गदळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवर ,श्री. विजयकांत मुंडे,श्री. वसंत केदार, श्री. विष्णू घुले,केज व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी, श्री.जालींदर मोराळे,मुरलीधर ढाकणे ,बालासाहेब मोराळे , बाबा चौरे, नांदे सर, खादिर खुरेशी,सुरज घुले, संतोष जाधव, सोनू सावंत, मच्छिंद्र जोगदंड, बाबुराव घुले, भैरवनाथ चाळक या सर्वानी पुढील कार्यासाठी राहुल गदळे यांना शुभेच्छा दिल्या मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व केज तालुक्यातील ज्येष्ठ व युवक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचाच झेंडा फडकणारा असल्याचा विश्वास नवनिर्वाचित तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल गदळे यांनी व्यक्त केला.





















