Homeताज्या बातम्यास्वाराती' संस्थेकरीता अभ्यागत मंडळ; अध्यक्षपदी खा.बजरंग सोनवणे यांची नियुक्ती !

स्वाराती’ संस्थेकरीता अभ्यागत मंडळ; अध्यक्षपदी खा.बजरंग सोनवणे यांची नियुक्ती !

‘स्वाराती’ संस्थेकरीता अभ्यागत मंडळ; अध्यक्षपदी खा.बजरंग सोनवणे यांची नियुक्ती !

बीड/प्रतिनिधी

बीड: स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय, अंबाजोगाई या संस्थेकरीता अभ्यागत मंडळ गठीत करण्यात आले आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी बीडचे खा.बजरंग सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय राज्य शासनाच्या वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने काढला आहे.स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय अंबाजोगाई या संस्थेत अंमलात असलेले नियम व आदेश यांच्या चौकटीमध्ये राहून रुग्णालयाच्या व्यवस्थापनांत सुधारणा करण्यासाठी मार्ग व साधने तयार करणे, निरनिराळ्या कामासाठी व विभागांसाठी मंजूर केलेल्या आर्थिक तरतूदींचा योग्य प्रकारे वापर होत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवणे. रुग्णालय संबंधिच्या जनतेच्या तक्रारीचा अभ्यास करणे व त्याचे निवारण होण्यासाठी करावयाच्या पध्दतीबद्दल शिफारस करणे, रुग्णालयातील कर्मचारी वर्गाची अनियमित उपस्थिती, अवक्तशीरपणा व गैरवर्तन इत्यादींबाबत आढावा घेणे व त्यांत सुधारणा व्हावी म्हणून शिफारस करणे. रुग्णालय परिसराची तपासणी करणे, सर्वसाधारण कामकाजांचा अभ्यास करणे व दोष आढळल्यास ते दूर करण्यासाठी उपाय सुचविणे. रूग्णालयासाठी जनतेकडून देणग्या नियंत्रित करणे, गोळा करणे व स्विकारणे व राज्य शासनास रुग्णालयांसाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही अशा विशेष बाबींसाठी त्या उपयोगात आणणे, कोणती देणगी स्विकारण्यामध्ये अथवा तिचा रुग्णालयासाठी उपयोग करताना अंमलात असलेल्या नियमांचा व आदेशांचा भंग होता कामा नये. उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी समितीच्या कामकाजामध्ये आवश्यक त्या पध्दती विहीत करणे व इतर आवश्यक त्या गोष्टी करणे. आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अमंलबजावणीचा आढावा घेणे आदि विषयांसाठी अभ्यागत मंडळ गठीत करण्यात आलेले असून खा.बजरंग सोनवणे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन महिन्याला खा.सोनवणे घेतील बैठक

 समितीची बैठक दोन महिन्यातून किमान एकदा तरी बोलविण्यात येणार आहे. अध्यक्षांनी निर्देशित केल्यास, अधिक वेळा बैठक बोलविता येईल. कोणीही सदस्य सतत दोन बैठकीत अनुपस्थित राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होईल, परंतु सदस्य योग्य व सबळ कारणांसाठी अनुपस्थित राहिला असल्यास सभासदत्व पुढे चालू ठेवण्यास शासन अनुमती देईल.समितीच्या प्रत्येका बैठकीची आगाऊ सूचना बैठकीच्या दिनांकापासून १० दिवस अगोदर बैठकीच्या कार्यसूचीसह समिती सदस्यांना पाठविण्यात येईल.संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना समितीच्या कोणत्याही बैठकीस उपस्थित राहण्याचा हक्क राहील व त्या उपस्थितीच्यावेळी त्यांना समितीच्या सदस्यांचे हक्क व दर्जा प्राप्त असेल. समितीच्या बैठकीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुबई यांना समितीच्या सदस्य सचिवांनी बैठकीच्या दिनांकापासून एक आठवड्याच्या आत पाठवावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!