सारोळा मांडवा येथे महसूल दिनानिमित्त शेतकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद!
जनक्रांती न्युज/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी रामराजे जगताप
धाराशिव:- वाशी तालुक्यातील मौजे सारोळा मांडवा येथे महसूल सप्ताह निमित्त मा.तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली १ऑगस्ट ते ७ ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा करणयात आला आहे त्या निमित्ताने सारोळा मांडवा येथे शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यात मंडळ अधिकारी एस.बि.उंदरे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून निकाली काढल्या तर ग्राम महसूल अधिकारी डि.व्ही.सिरसेवाड पाटील यांनी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी,अँग्री स्टॉक,सलोखा योजना,शेत रस्ते या बाबत सविस्तर माहिती दिली तसेच शेतकरी बांधवांशी संवाद साधताना ते म्हणाले की शेती करतान शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी गटामार्फत शेती करावी जास्ती जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करावी शेतकऱ्यांनी एकमेकांना सहकार्य करून येणाऱ्या अडचणी वर मात करावी असे सांगितले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानां अंतर्गत गावातील शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मौजे सारोळा मांडवा येथील आश्रुबा भरत डोईफोडे या आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या घरी भेट देऊन मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व शेवटी भगवान शिंदे यांनी कार्यक्रमांची सांगता केली. कार्यक्रमास गावातील पोलीस पाटील सरपंच व गावकरी मंडळी उपस्थित होते गावकऱ्यांनी महसूल दिनानिमित्त सर्व उपस्थित महसूल कर्मचाऱ्यांचे आभार मानले.





















