शुभम घोडके पाटील शिरूर पंचायत समिती गणातून निवडणुकीच्या उतरणार मैदानात!
केज /प्रतिनिधी
प्रमुख्याने नागरिकांचे प्रश्न तालुका ठिकाणीच असतात,पंचायत समिती च्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवता येतील या धोरणाने शिरूर पंचायत समिती गणातून निवडणूक लढणार.नांदूरघाट जिल्हा परिषद गटामध्ये गेली कित्येक वर्ष जनहिताची कामे करून लोकांच्या संपर्कात असलेले शुभम घोडके पाटील नांदूर जिल्हा परिषद गटातील शिरूर पंचायत समिती गणातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शुभम घोडके यांनी अनेक आंदोलने केले आहेत.सदैव नागरिकांच्या सुख दुःखात अडीअडचणीत शुभम घोडके पाटील हे उपलब्ध होते.नागरिकांचे प्रमुख प्रश्न,अडचणी,कामेहे तालुक्यातील पंचायत समिती,तहसील,कृषी कार्यालय,दवाखाना याच ठिकाणी प्रमुख्याने असतात,पंचायत समिती च्या माध्यमातून तालुका स्थरावर नागरिकांचे प्रश्न सोडवता येईल हा विचार करत तसेच शुभम घोडके पाटील यांचे सहकारी मित्र,मार्गदर्शक व नागरिकांसोबत चर्चा करून शिरूर पंचायत समिती गणातून स्वतःहा लढण्याचा निर्णय शुभम घोडके पाटील यांनी घेतला आहे.शिरूरघाट पंचायत समिती गणातील माय बाप जनतेने माझ्या पाठीशी उभा राहावे असे आवाहन शुभम घोडके पाटील यांनी केले आहे.





















