रामनगर जि.प. शाळेतील शिक्षकांचा निरोप कार्यक्रम उत्साहात संपन्न!
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:- कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील रामनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच ॲड रामराजे जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच विजय उर्फ सोनु कवडे हे होते.मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संतोष काशिद यांनी केले.शाळेतून बदली होऊन गेलेले शिक्षीका श्रीम. सावंत भागीरथी प्रभाकर यांचा सत्कार फेटा,शाल,पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच शाळेत नव्याने रुजू झालेले शिक्षक शिंदे प्रकाश रामराव यांचा सत्कार करुन स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच ॲड रामराजे जाधव आणि उपसरपंच विजय उर्फ सोनु कवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळेतील विद्यार्थी शिक्षक,मान्यवर यांनी आप आपली मनोगते व्यक्त केले या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर मिटकरी, उपाध्यक्ष शुभम कवडे, सिद्धेश्वर कवडे,सुहास कवडे, घनश्याम जाधव, सुरेश कवडे, रामदास गुरव,सौ. प्राची मिटकरी,सौ. अमरजा कवडे,सौ. प्रणिता कवडे यांच्यासह माता व पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष काशिद यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार आश्रुबा कवडे यांनी मानले अनेक वर्ष या शाळेत कार्यरत असल्यामुळे व प्रामाणिकपणे अध्यापनाचे कार्य केल्यामुळे गुरु शिष्यांची स्नेहाची नाती निर्माण होत असतात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.





















