युसूफवडगांव येथील मंडळ कृषी कार्यालय वर्षातुन फक्त प्रजासत्ताक दिन,स्वातंत्र्य दिन व 1 मे लाच उघडतात बाकी दिवस कायम बंद?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील युसूफवडगांव येथील मंडळ कृषी कार्यालय हे वर्षातुन फक्त प्रजासत्ताक दिन,स्वातंत्र्य दिन,1 मे व 17 सप्टेंबरला झेंडा वंदन व ध्वजारोहणासाठी व महिन्यातुन 1 दिवस मिटिंगसाठी उघडल जाणारे व इतर दिवस हे कार्यालय कायम बंद असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येतात. युसूफवडगांव येथे असलेले व 27 गावांचे कार्यक्षेत्र असणारे मंडळ कृषी कार्यालय हे कायम बंद असल्याने या 27 गावामधील शेतकऱ्यांना कृषी विभागाशी कामा संदर्भात सतत अडचणी येतात कुठल्याही लहान सहान कामासाठी शेतकऱ्यांना अधिकारी व कर्मचारी शोधत केजला तालुक्याच्या ठिकाणी कामधंदा सोडून जावे लागते.युसूफवडगांव परिक्षेत्रातील 27 गावामधील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासनाने युसूफवडगांव येथे मंडळ कृषी कार्यालय उघडून ठेवले आहे पण तेथे कोणीच अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतात कारण हे कार्यालय कायम कुलूप बंद असते.हे कार्यालय वर्षातुन फक्त प्रजासत्ताक दिन,स्वातंत्र्य दिन,1 मे व 17 सप्टेंबरला व महिन्यात एक दिवस मिटिंगसाठी उघडले जाते एकुण विचार केला तर हे कार्यालय वर्षातुन जेमतेम 48/50 दिवसांसाठी उघडले जाते ते पण शेतकऱ्यांच्या कामासाठी नाही तर फक्त मिटिंगसाठी बाकी दिवस हे कायम बंद असते त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात.कुठल्या लहान-सहान कामासाठी अथवा फाईलवर सही पाहिजे असेल तर अधिकारी,सुपरवायझर व कर्मचारी सापडत नाहीत मग शेतकऱ्यांनी कुणाकडे जायचे हुकून-चुकून जर अधिकारी व सुपरवायझर सापडले तर या केजला मग येथील ऑफिस काय कामाचे येथील आँफिसचा कारभार जर केजहुन हाकला जाणार असेल शासनाने युसूफवडगांव येथील मंडळ कृषी कार्यालय कायमचे बंद करून शेतकऱ्यांवर उपकार सतत गैरहजर राहणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करून हे कार्यालय कायम शेतकऱ्यांच्या कामासाठी कसे उघडे ठेवता येईल याची दक्षता घ्यावी अशीच शेतकऱ्यांची ईच्छा आहे.





















