मांढरगडाची मांढरदेवी काळुबाई! “तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई !
रायगड जिल्हा प्रतिनिधी/कैलासराजे घरत
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ मांढरदेवीचं मंदिर एका डोंगरावर वसलेलं आहे. याला काळुबाईचं मंदिर म्हणूनही ओळखलं जात.गर्द करवंदीच्या वनराईमध्ये विराजमान असलेल्या काळुबाईचे स्थान शंभू-महादेवाच्या डोंगररांगेत पुणे-सातारा जिल्ह्यांसह वाई-भोर-खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर वसलेले आहे. वाईच्या उत्तरेकडे मांदार पर्वत आहे, हा पर्वत ‘मांढरगड’ या नावाने प्रसिद्ध आहे.बुधवार पेठेत असलेले हे मंदिर स्थानिक लोककथांशी संबंधित देवी कालेश्वरी देवीला समर्पित आहे. पुण्यातील बुधवार पेठेतील एका निवासी अपार्टमेंटच्या तळघरात असलेले काळूबाई मांढरदेवी मंदिर १९९९ मध्ये सतीश चव्हाण यांनी स्थापन केले.काळुबाईचे मंदिर लहान आहे, पण सभामंडप आणि मंदिराचा गाभारा मोठा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिराचा कळस रेखीव असून त्यावर गाय, सिंह यांच्या मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा देखील आहेत. मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीरबाबा या देवी सेवक आणि राखणदारांचीही मंदिरे आहेत. मांढरच्या काळुबाईची मूर्ती स्वयंभू असल्याचे म्हटले जाते. देवीच्या चतुर्भुजी मूर्तीच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल आणि तलवार आहे, तर डाव्या हातामध्ये ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे. देवी उभी असून तिचा एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. वार्षिक यात्रा उत्सवाच्या दिवशी म्हणजे पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवीला सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवला जातो.





















