मराठा आरक्षण आंदोलनासाठी कन्हेरवाडी येथील मराठा बांधवांचे मूंबईकडे प्रस्थान!
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप
धाराशिव जिल्हा प्रतीनीधी:-मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील मराठा बांधव दि.२८ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईकडे प्रस्थान झाले आहेत.मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे कुच केले असुन मनोज जरांगे पाटील यांनी दि २७ ऑगस्ट रोजी आंतरवली येथील ग्रामदैवतांचे आशिर्वाद घेऊन तसेच श्रीगणपती बाप्पाचे पुजन करुन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पुजन करुन लाखों मराठा बांधवांना सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दि.२९ ऑगस्ट मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील मराठा बांधव दि.२८ रोजी सकाळी मुंबईकडे प्रस्थान झाले आहेत मराठा योध्दा कन्हेरवाडी गावचे सरपंच ॲड रामराजे जाधव यांच्या वतीने डिझेल साठी प्रत्येकी वाहनास चार चार हजार रुपये रोख देऊन शुभेच्छा दिल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबई येथे करोडोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार असुन कन्हेरवाडी सह कळंब तालुक्यातुन हजारो मराठा बांधव दि.२६,२७,२८ऑगस्ट रोजी मुंबईकडे प्रस्थान झाले आहेत कन्हेरवाडी येथील मुंबईला जाणाऱ्या मराठा बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाकेची आतषबाजी करत एक मराठा लाख मराठा,आता कुठ जायच मूंबईला जायच,छत्रपती शिवाजी महाराज की जय,डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय, अहिल्याबाई होळकर की जय, अण्णाभाऊ साठे की जय,जय जिजाऊ जय शिवराय,आता कसं पाटिल म्हणतील तस अशा घोषणा देत ग्रामस्थांनी मराठा बांधवांना मूंबईला जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















