भाजपाच्या तालुका चिटणीसपदी लोमटे यांच्या निवडीबद्दल सत्कार!
जनक्रांती न्युज/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी रामराजे जगताप
धाराशिव :-भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक मजबुती साठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या मान्यतेनुसार आमदार मा. राणाजगजितसिंह पाटील,मा. आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार धाराशिव जिल्ह्यातील पक्षाचे संघटनात्मक काम अधिक जोमाने व बळकट व्हावे यासाठी संघटनात्मक बांधणीच्या पातळीवर धाराशिव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची तालुका पश्चिम ग्रामीण मंडळाची कार्यकारणी गठीत करण्यात आली यामध्ये तुगांव येथील सचिन लोमटे यांची तालुका चिटणीसपदी निवड होताच भाजपा महिला मोर्चाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जि.प.माजी सदस्या,सौ.अंजलीताई बेताळे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्या, मनीषाताई केंद्रे अल्काताई गौरकार, श्रमिक महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा अनिता तौडकर,शशिकला मुंडे, शुभम खोत यांनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





















