प्रा.लक्ष्मण हाके सर ड्रायव्हरचा पगाराच काय केले?/दिला का बुडवला?
संपादकीय/रोहन गलांडे
ओबीसीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांपासून जरांगे पाटील यांच्यापर्यंत सर्वांवर जोरदार आरोप करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना आता वेगवेगळ्या ठिकाणाहून लक्ष करण्यात येऊ लागले आहे . ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना समाजाने दिलेल्या आलिशान गाडीवरून अमोल मिटकरी यांच्यापासून तटकरेंपर्यंत मोठे मोठे नेते टीका करत होते त्यामुळे हाकेची मागिल काळात अडचणी वाढ झाली होती . मागिल काळात लक्ष्मण हाकेंच्या ड्रायव्हरने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते हाके यांच्यावर त्यांचे पूर्वीचे गाडी चालक सचिन बंडगर यांनी आपला दोन वर्षांचा पगार बुडवल्याचा आरोप केला होता .आपल्या पत्नीला नोकरी लावतो म्हणूनही आपल्याला फसवल्याचे आरोपही ड्रायव्हर सचिन बंडगर यांनी केले होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना सचिन बंडगर म्हणाले की मी गेल्या पाच वर्षांपासून हा केंद्र ड्रायव्हर म्हणून काम करत होतो .हाके साहेब समाजाचे काम करत असल्याने मी गेल्या तीन वर्षांपासून पगार मागितला नाही .काम सोडत असताना मी तुला पगार देतो काही घरच्या अडचणी आहेत असं म्हणून त्यांनी मला वापरून घेतले .पत्नीला नोकरीला लावतो म्हणतही त्यांनी माझी फसवणूक केली असा आरोप लक्ष्मण हाके यांचे पूर्वीचे ड्रायव्हर सचिन बंडगर यांनी केला होता नंतर त्या विषयावर कोणी का बोलले नाही असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















