पत्रकारितेच्या नव्या पर्वाची सुरुवात‘मुद्द्याचं बोलू चॅनेल’चे ऑफिस उद्घाटन थाटात संपन्न !
धाराशिव /प्रतिनिधी
पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्या दमाने पाऊल टाकत, बीबीसी न्यूज मराठीचे कन्सल्टंट रिपोर्टर आणि ‘मुद्द्याचं बोलू’ चॅनेलचे संपादक मुस्तान मिर्झा यांच्या पॉडकास्ट स्टुडिओ आणि ऑफिसचे उद्घाटन अत्यंत थाटामाटात पार पडले.या सोहळ्याचे उद्घाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास दादा पाटील, तसेच ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि मार्गदर्शक अभय देशपांडे सर यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटनाच्या या प्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील अनेक नामवंत पत्रकार उपस्थित होते. त्यामध्ये मुख्तार मिर्झा, दैनिक सामनाचे अशोक शिंदे, दैनिक लोकमतचे बालाजी अडसूळ, दैनिक दिव्य मराठीचे शीतलकुमार घोंगडे, दैनिक एकमतचे सतीश टोणगे, नवमतचे अकिब पटेल, अंतरसंवादचे खादिम सय्यद, ऑनलाइन धाराशिव न्यूजचे सिकंदर पठाण, तसेच अमजद मिर्झा, अरेफ मिर्झा, इमरान मिर्झा, मूनवर मिर्झा, समीर मिर्झा आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी बोलताना मान्यवरांनी मुस्तान मिर्झा यांच्या नव्या उपक्रमाचे कौतुक केले व धाराशिव जिल्ह्यातील पत्रकारितेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.





















