नाफेड सोयाबीन खरेदी केंद्राचे जोतीराम औताडे पाटील यांचे हस्ते उदघाटन !
अंबाजोगाई प्रतिनिधी /भागवत सेलूकर
दि ८/१२/२५ रोजी अंबाजोगाई येथील मोंढा भागातील नाफेड मार्फत चालवल्या जात असलेल्या सोयाबीन खरेदी केंद्राचे उदघाटन सेलू अंबा येथील प्रतिष्ठीत शेतकरी श्री ज्योतीराम औताडे पाटील यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले . सध्या अंबाजोगाई तालुका परीसरात शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला अंत्यत कमी भाव मिळत असून शेतकऱ्याची मोठया प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे . महाराष्ट्र शासनाने नाफेड मार्फत ५३२८ अशा हमीभावाने शेतकर्यांच सोयाबीन खरेदी करण्याचे ठरवले आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे . परंतु या सोयबीन खरेदी केंद्राची संख्या खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊन गैर सोय होत आहे . त्यामुळे शासनाने सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या वाढवून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी शेतकरी बांधव करत आहेत . तसेच काही खरेदी केंद्र अद्याप ही सुरू झालेली नाहीत . ती लवकरात लवकर सुरू करून शेतकर्यां ना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे . यावेळी परिसरातील शेतकरी बांधव व कर्मच्यारी उपस्तीथ होते.





















