धोतरा जि.प. शाळा खोल्यात पावसाळ्यात साचते पाणी,विद्यार्थ्यांचे बेहाल/लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज!
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील धोतरा जिल्हा परिषद शाळेत भर पावसाळ्यात शाळेतील वर्ग खोल्यात पाणी साचते कारण शाळेच्या छतावर टाकलेल्या पत्रे पावसाळ्यात गळत आहेत त्यामुळे शाळा गळत आहे व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा सुध्दा राहत नाही किंवा कुठे बसावे हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळत नाही त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे बेहाल होत आहेत अशा वर्गात पाणी साचलेल्या शाळेत विद्यार्थी काय शिक्षण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच लहान विद्यार्थी अजारी सुध्दा पडु शकतात कारण शाळेच्या छतावर टाकलेल्या पत्रे पावसाळ्यात पाणी गळत असेल त्यामुळे वर्गात पाणी साचुन मछर होऊ शकते त्यामुळे डेंग्यू, ताप येणे सहाजीक आहे त्यामुळे धोतरा जिल्हा परिषद शाळे कडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे.





















