तुगांव शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात संपन्न !
कळंब/प्रतिनिधी
धाराशिव :- धाराशिव तालुक्यातील तुगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुगांव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक दिना निमित्त शाळा शालेय व्यवस्थापन समिती, तुगांव यांच्या वतीने शाळेतील मुख्याध्यापक प्रमोद अनपट,सहशिक्षक शिवदास चौगुले, नवनाथ बचाटे,बाहुबली नवले,सलभकुमार भगत, दत्तात्रय पडवळ, नामदेव डुकरे,अमोल वैद्य, व तुगांव गावातील मार्गदर्शक शिक्षक दत्ता हाजगुडे पाटील, निशिकांत पाटील, मंदाकिनी भुतेकर मॅडम या शिक्षकांचा पुष्पगुछ देऊन त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, दिलीप अण्णा शेंडगे, प्रमुख उपस्थिती भाजपा तालुका उपाध्यक्ष अनिल भाऊ भुतेकर, पोलीस पाटील तुगांव श्रुतिका हाजगुडे,भाजपा तालुका चिटणीस सचिन लोमटे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा प्रीती हाजगुडे, सदस्य संगिता भुतेकर, मिरा शितोळे, समाधान पाटील व उमेद प्रभाग संघाच्या मॅनेजर रुपाली शेंडगे,सी.आर.पी. सुजाताताई मोरे, ग्रामसेवक नलावडे साहेब गावातील शिक्षक प्रेमी नागरिक, नेताजी मोरे, विकास शेंडगे सर, अशोक गडकर, बालाजी शितोळे, युवक संतोष हाजगुडे, अक्षय शेंडगे उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सचिन लोमटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवदास चौगुले सर यांनी मानले यावेळी विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















