जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा द्या, मराठा सेवक मधनलाल प्रदेशी, सुधाकर शिंदे, सुंदर औताडे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!
बीड/प्रतिनिधी
मराठा संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांची सुपारी देवुन हत्या घडवणाऱ्या कट रचणाऱ्याची वरिष्ठ एसआयटी चौकशी करून कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी व संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पदान करण्यात यावी अन्यथा मागणी मान्य केली नाही तर व जरांगे पाटील यांच्या जिविताला काही झाले तर अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्रराज्य संघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाज अंबाजोगाई, मराठा सेवक मधनलाल प्रदेशी, सुधाकर शिंदे, सुंदर औताडे प्रदेशाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी उपजिल्हाधिकारी निवेदन देऊन दिला आहे व त्यांला जबाबदार प्रशासन व पाटलांना जिवे मारण्याचा कट रचनारी टोळी जबाबदार राहील असा इशारा सरकारला निवेदनाद्वारे देत आहे असे मराठा सेवक मधनलाल प्रदेशी, सुधाकर शिंदे, सुंदर औताडे तहसीलदारांना निवेदन रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.मराठा संघर्ष योध्दा श्री. मनोजदादा जरांगे पाटील यांची 2.5 कोटी रू.ची सुपारी देवुन हत्या घडवण्याचा प्रयत्न झाल्याबाबत जालना पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली असून संशयीत दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत असून या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषी विरूध्द कायदेशिर कार्यवाही करावी व मराठा संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याने त्यांना Z + सुरक्षा पदान करावी, ही विनंती ही मागणी मान्य नाही केली तर व यांच्या जिविताला काही झाले तर अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्रराज्य संघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा सेवक मधनलाल प्रदेशी, सुधाकर शिंदे, सुंदर औताडे उपजिल्हाधिकारी निवेदन प्रदेशाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी दिला आहे व त्यांला जबाबदार प्रशासन व पाटलांना जिवे मारण्याचा कट रचनारी टोळी जबाबदार राहील असा इशारा सरकारला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.





















