Homeताज्या बातम्यागणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे पोलीस अधीक्षक यांचे आवाहन!

गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे पोलीस अधीक्षक यांचे आवाहन!

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:-जिल्ह्यात येत्या २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. जिल्ह्यातील हजारो सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशमूर्ती स्थापना करून विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, शांततेत व सुरक्षिततेत उत्सव पार पाडावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना यांनी केले आहे गणेशोत्सव हा ऐक्य,भक्ती आणि सामाजिक बंध यांचा उत्सव असला तरी काही वेळा अति उत्साहामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की सर्व सार्वजनिक मंडळांनी आपली नोंदणी जवळच्या पोलीस ठाण्यात करणे आवश्यक आहे तसेच ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी “एक गाव एक गणपती”, “एक गल्ली एक गणपती” यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियम व नियमांचे काटेकोर पालन करावे यासोबतच वाहनतळ व्यवस्थापन व वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विशेष लक्ष द्यावे असेही निर्देश देण्यात आले आहेत गणेश मंडपांना भेट देणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला सुरक्षा पथक व स्वयंसेविका नियुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात ४ पोलीस निरीक्षक, १९ सहाय्यक पोलीस निरीक्षक,४० पोलीस उपनिरीक्षक,५० एसआरपी प्लाटून, ७७० होमगार्ड व एकूण १६०० पोलीस कर्मचारी व अधिकारी कार्यरत राहणार आहेत “गणेशोत्सव दरम्यान कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता सर्वांनी घ्यावी. कोणताही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा अपप्रवृत्तीला वाव मिळणार नाही, यासाठी नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!