खा.बजरंग सोनवणे यांनी मराठा आरक्षण लढाईत बलीदान देनारे स्व.सतीश देशमुख यांच्या घरी दीली सांत्वनपर भेट !
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील वरपगाव ता.केज येथील युवक स्व.सतीश देशमुख यांचे मराठा आरक्षण लढ्यासाठी मुंबईकडे जात असताना ह्रदय विकाराने काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले होते नंतर आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांत्वन पर भेट दिली तसेच आज त्यांच्या वरपगाव येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन स्व.सतीश देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच बोरगाव बु. ता.केज येथील कै.अशोक दादा गव्हाणे यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले.आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.तसेच चिंचोलीमाळी तसेच काळेगावघाट ता.केज येथील ग्रामस्थांची भेट घेऊन संवाद साधला आहे.





















