केजचा गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर अरोपी आणखी फरारच?/विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल?
केज/प्रतिनिधी
नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीला गाडीत बसवून पुढे रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत गाडी थांबवून तिच्याशी अश्लिल चाळे करणाऱ्या के जचा गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर (रा.उमरी रोड,केजचा गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याने दि. १८ सप्टेंचर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास धारूर चौक ते चिंचपूर रोडवरून गाडी रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत थांबवली. या ड्रोम्यान त्याने काय काय केले हे पिडित विद्यार्थीनीने तक्रारीत नमूद केले आहे. मात्र, त्या आधी किया त्यानंतरचे बेडसकख्या काही ऑडियो क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये एक महिला लक्ष्मण सर या नावाचा उल्लेख करत असून समोरून् वेडसकर ‘काल कुठे गेलतात्, सोबत ते कोण होत’ असे विचारता, त्यावर महिला म्हणते मैत्रीण होती, काहो अवडतंय का? असे विचारत असल्याचे समोर आले आहे. या ऑडिओ क्लिप आणि सदरील प्रकारानंतर घटनास्थळाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून त्यामध्ये एक महिला आणि अल्पवयीन मुलगी दिसून येत आहे. त्यांच्यासोबत गळ्यात आयकार्ड असलेला व्यक्ती देखील व्हिडीओमध्य दिसत आहे बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात लक्ष्मण बेडसकर याच्याशिवाय कागद सुध्दा हालत नाही. बेडसकर केजचा गटशिक्षणाधिकारी असतांना तो बीडच्या शिक्षण विभागात लुडबुड करतो, यामागे साहेबांचाथ वरदहस्त असून बेडसकर हा शिक्षणाधिकारी फुलारी यांच्या अतिशय जवळचा असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात ११ गटशिक्षणाधिकारी आहेत. मात्र एकमेव केजया गटशिक्षणाधिकारी बेडसकर हा साहेबाचा लाडका कसा? अशी चर्चा होवू लागली असून लाडका म्हणू-म्हणू त्याच्यावर कामापेक्षा जास्त विश्वास साहेबांनी टाकला. मात्र विश्वासाचा बेडसकर शेवटी रंगेल निघाला हे या प्रकरणावरून समोर आल्याची चर्चा होवू लागली आहे.पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान बेडसकर याने केलेल्या कृत्यानंतर काही ऑडिओ क्लिप आणि व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली असून त्यामधील प्रकार पाहता रंगेल बेडसकर विरुध्द प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होवू लागली आहे. बेडसकरमुळे शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेचे देखील बदनामी झाली असून या घटनेचा निषेध व्यक्त होवू लागला आहे. केज पोलिस ठाण्यात पिडित विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व माझी मानलेली मावशी आणि त्यांची लहान मुलगी असे आम्ही वाढदिवसाचा केक आणण्यासाठी गेलो असता, लक्ष्मण बेडसकर हे त्यांची स्विफ्ट कार घेवून आले व आम्हाला गाडीत बसायला लावले. त्यानंतर गाडी शहरापासून काही अंतरावर नेवून रस्त्याच्या कडेला थांबवली आणि बेडसकर याने वाईट हेतूने माझा हात धरून अश्लिल कृत्य केल्याने आम्ही ओरडू लागलो. त्याचवेळी पाठीमागून एक कार येवून तिथे थांबली. कारचा उजेड पाहून बेडसकर तेथून पळून गेला. त्या गाडीत माझे आई व इतर होते असे पिडितीने तक्रारीत म्हटले आहे. लक्ष्मण बेडसकर याने केलेल्या कृत्याप्रकरणी पिडित विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरून बेडसकर विरुध्द कलम ७४,७५ (१), ७५ (२), ३५१ (२) बीएनएससह कलम बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ आणि १२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान बेडसकर घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगण्यात आले असले तरी नंतर तो केज पोलिस ठाण्यात आला होता. मात्र पोलिसांनी तेथून जायला सांगितले. एवढेच नव्हे तर ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये केजचे एपीआय क्षीरसागर हे एका व्यक्तीशी बोलत असल्याचे ऐकू येत आहे. साहेबांची गाडी कुठंय? असं एपीआय क्षीरसागर त्यामध्ये बोलत आहेत. त्यावरून पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.





















