कानेश्वर विद्यालयाचे शिक्षक नरहरी काकडे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत !
केज – प्रतिनिधी
तालुक्यातील साबला या गावचे रहिवासी असलेले तसेच कानेश्वर विद्यालय , कानडीमाळी . येथे क्रीडासहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीमान नरहरी शहाजी काकडे यांना श्रीमान वैभव जगदेवी विवेक स्वामी , संपादक , समर्थ राजयोग , यांच्या नियोजनाने आद्य पत्रकार ” बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – 2025 ” देऊन सन्मानित करण्यात आले आहे . या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक नितिन कोटेचा , तसेच प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान , माजी आमदार उषाताई दराडे , जेष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे , दैनिक लोकप्रभा संपादक तथा , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष संतोषराव मानुरकर , सारडा सेठ , धुत सेठ इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर , क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले , भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . तसेच श्रीमान नरहरी शहाजी काकडे यांचे कानेश्वर विद्यालय , कानडीमाळी .तसेच त्यांच्या साबला या मुळ गावी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल . म्हणजेच स्वच्छता मोहीम , वृक्षारोपण मोहीम आणि सामाजिक कार्यात सहभाग ,आरोग्य शिबीर , व्याख्यान कार्यक्रमांच्या आयोजनात सहभाग , साक्षरता कार्यक्रम, ग्रामस्वच्छता अभियान मध्ये उत्कृष्ट कार्य , सामाजिक , सांस्कृतिक , क्रीडा , माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य इत्यादी बाबींचा विचार करून श्रीमान नरहरी शहाजी काकडे यांना श्रीमान वैभव जगदेवी विवेक स्वामी , संपादक , समर्थ राजयोग यांच्या वतीने आद्य पत्रकार ” बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – 2025 ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .या वेळी श्रीमान समीर काझी , संपादक बीड प्रहार , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , पोपट काकडे , माजी ग्रामपंचायत सदस्य रामराजे शिंदे , अंकुशराव मुळे , राहुल सरवदे तसेच गणेश कटारे , महादेव काकडे , लखन राऊत , सुदर्शन काकडे , आकाश काकडे , वसंत नाईकनवरे , दादा परळकर , अनिल भोसले , हनुमंत परळकर , शिवाजी नाईकनवरे , भरतराव काकडे , तानाजी आंडिल , संजय सरवदे या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या वेळी साबला नगरीतील सर्व मित्र परिवार उपस्थितीत होता .





















