कन्हेरवाडी येथे मुंबईवरून आलेल्या आंदोलकांचे उत्साहात स्वागत!
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:- मागील पाच दिवस मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठी समाजाला कुणबी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे व हैदराबाद ग्रॅझेट लागू करावे ही मागणी घेऊन मुंबई येथे लाखो कार्यकर्त्यांसह आझाद मैदानावर थांबले होते त्यांच्या उपोषणाला 2 सप्टेंबर हा पाचवा दिवस होता त्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली होती या समितीने सखोल चौकशी करून 2 सप्टेंबर रोजी उपोषण स्थळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व त्यांना समितीच्या नीर्णया विषयी माहिती दिली व मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद ग्रॅझेट लागू करावे व त्याविषयीचा जीआर हाती दिल्यानंतर उपोषण मागे घेऊ अशी घोषणा केली तसेच सातारा, औंध ग्रॅझेट लागू करण्याविषयी शासनाने निर्णय घेऊन इतर मागण्या मान्य करण्यात आल्या मंत्री समितीतील मा. राधाकृष्ण विखे पाटील,मा. उदय सामंत,मा. माणिक कोकाटे यांनी हैदराबाद ग्रॅझेट लागू करण्या विषयीचा जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जीआर सुपूर्द केली याप्रसंगी मा शिवेंद्रराजे भोसले,मा. प्रताप सरनाईक, तुळजापूरचे आमदार मा. राणाजगजितसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती जीआर हाती मिळतात आझाद मैदानावर उपस्थितीत तसेच मुंबई येथील आंदोलन कार्यकर्त्यांनी अतिश बाजी करत व फटाके फोडून आणि गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त केला या आंदोलनासाठी कन्हेरवाडी येथील अनेक आंदोलक मुंबई येथील आझाद मैदानावर गेले होते काही आंदोलक परत आले होते तर शेवटपर्यंत थांबणारे मराठा संघर्ष योद्धा विक्रम विजयराव कवडे, अजय नंदकिशोर कवडे, अनंत पाटील, विजय साहेबराव कवडे, रंजीत साळुंके,कृष्णा कवडे, सुरेश मंचिक कवडे, आप्पा शिवाजी कवडे हे 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुखरूप गावी परतले गावात येतात फटाकेची आतषबाजी करत गुलाल उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच गावातुन मुंबईला जाऊन आलेल्या सर्व बांधवासह जम्बो सत्कार करुन भर पावसात गावामध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली यावेळी भरपावसात महिलांनी पण मुंबई वरून आलेल्या सर्व मराठा बांधवांना ओवाळून पेढे भरवले या सत्कार आणि मिरवणुकीचे नियोजन सरपंच ॲड. रामराजे जाधव, उपसरपंच विजय उर्फ सोनू कवडे, सुधाकर कवडे,शरद पंडित कवडे,धनंजय भास्कर जगताप यांनी केले होते भरपावसात मिरवणुकीमध्ये सर्व जाती-धर्माचे युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















