उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालय भरदिवसा ढवळ्या आकडा टाकून विज चोरी !
अंबाजोगाई /प्रतिनिधी
सर्वाना समान मापदंड न दाखवता महावितरण या वीज चोरीसाठी उप अभियंता बांधकाम विभाग कार्यालयांवर मेहरबान का झाले?शहरातील शासकीय कार्यालयातच वीज चोरीचा राजरोसपणे सपाटा सुरुच अंबाजोगाई शहरातील उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयात दिवसा ढवळ्या वीज वाहक तारांवर आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या शासकीय कार्यालयाचा सावळा प्रताप उजेडात आला असुन या विज चोरांवर महावितरण कोणती कारवाई करणार? याकडे संपुर्ण सर्व सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.सर्व सामान्य जनतेने वीज वाहक तारांवर आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे प्रकार असतांना अशी वीज चोरी पकडल्यानंतर शहरातील गोरगरीबांना मोठा आर्थिक दंड आणि कारवाई झाल्याचे वास्तव्य आहे.परंतु अंबाजोगाई शहरातील मध्य भागी असलेल्या उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयात गेल्या कित्येक वर्षांपासून आकडा टाकूनच चोरुनच वीज वापरली जात आहे.याविरुद्ध आश्चर्य व्यक्त केले आहे.शासकीय कार्यालयात वीजेशिवाय कुठलेच काम चालत नाही,त्यामुळेच आधुनिक साधनासाठी महिन्याला शेकडो युनिटचा होणारा वापर हा कोणाच्या नावावर जातो असा प्रश्न उपस्थित होत असुन या गोंधळाबाबत महावितरण गप्प असल्याने सर्व सामान्य नागरिक संभ्रमात आहेत.सर्वाना समान मापदंड न दाखवता महावितरण या वीज चोरीसाठी उप अभियंता बांधकाम विभाग कार्यालयांवर मेहरबान का झाली?गेल्या कित्येक वर्षांपासूनच राजरोसपणे वीजपुरवठा चोरी केल्याचे बील वसुल होणार का?या शासकीय वीज चोरांवर महावितरण कार्यवाईचे धाडस दाखवणार का?या बाबत वरिष्ठ अधिकारी दखल घेतील का?सर्व सामान्य नागरिकांकडून वीजवाहक तारांवर आकडा टाकून वीज चोरी केल्यास महावितरण कठोर बडगा उघडतो,मग शासकीय कार्यालयांनी हा प्रकार केल्यावर त्यांना अभय का मिळतो.असा प्रश्न उपस्थित होत आहे.





















