आष्टी पंचायत समितीत स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा /भिंतींवर सुपारीच्या पिचकाऱ्यांचा वर्षाव!
बीड/प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्राम स्वच्छता स्पर्चा” आयोजित व करून उत्तम कामगिरी करणाऱ्या गावांना व शहरांना पारितोषिके मिळवण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री स्वच्छता अभियान ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची मोहीम आहे, जी राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भाग स्वच्छ, निरोगी आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने राबवली जाते. या अभियानाचे प्रमुख उद्दिश म्हणजे जनतेत स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करणे, कचरा व्यवस्थापन सुधारणा करणे आणि प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहेत, शासनचा एकीकडे “स्वच्छ भारत अभियान “च्या गाजाबाजा तर दुसरीकडे आही पंचायत समितीच्या कार्यालयात आणि परिसरात स्वच्छतेची दयनीय अवस्था असल्याचे चित्र दिसून येत आहे. भिंतींवर सुपारीच्या पिचकवन्यांचे डाग, आवारात कचऱ्याचे ढीग, मोकळ्या बाटल्या, आणि निष्क्रिय स्वच्छता कर्मचारी अशी परिस्थिती असताना “स्वच्छतेचा आदर्श’ दाखवण्याच्या घोषणा केवळ कागदावरच दिसतात, पंचायत समितीच्या आवारातय स्वच्छतेचा अभाव असल्याने गावपातळीवरील कामकाजाची कल्पना सहज येते. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही कुणी दखल घेत नाही.शासन लाखो रुपये खर्च करून स्वच्छ भारत मिशन रायष्ट्रीय पुरस्कार वितरण होते, अंमलबजावणी मात्र पूर्ण हुन् अधिक दिसून येत नाही.





















